Monday, February 24, 2025
Homeजरा हटकेChanakya Neeti: आचार्य चाणक्य यांच्या मते 'या' चार लोकांशी चुकूनही करू नये...

Chanakya Neeti: आचार्य चाणक्य यांच्या मते ‘या’ चार लोकांशी चुकूनही करू नये भांडण


आचार्य चाणक्य (aacharya chanakya) यांनी शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेली चाणाक्य नीती (Chanakya Neeti) आजच्या जीवनातही तितकीच समर्पक आहे. त्यांच्या नीतीचा अवलंब करून आजही उत्तम जीवन जगता येणे शक्य आहे.

त्यामुळे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ध्येय धोरणांबाबत कायमच उत्सुकता असते. आचार्य चाणक्य यांच्या मते, शांत आणि सुखी जीवन जगण्यासाठी कोणाशीही वाद घालू नये. मात्र अनेकदा इच्छा नसताना आपण वादात ओढले जातो आणि निरर्थक वाद होतो. चाणक्य नीतिमध्ये कोणत्या प्रकारच्या व्यक्तींशी वाद घालू नये, याबाबत सांगितलं आहे. या लोकांशी वाद घालणं महागात पडतं, शिवाय त्यांना राग अनावर झाल्यास आपल्या जीवावरही बेतू शकते.

गुपित माहित असलेला व्यक्ती
आचार्य चाणक्य यांच्या मते, गुपित माहित असलेल्या व्यक्तीसोबत कधीही भांडण करू नये. यामुळे संबंधित व्यक्ती आपलं गुपित उघड करू शकते. विभीषणाला रावणाचे गुपित माहिती होते. त्याने हे गुपित रामाला सांगितलं. त्यामुळे रावण युद्धात मारला गेला.

मूर्ख व्यक्ती
आचार्य चाणक्य यांच्या मते कधीही मूर्ख व्यक्तीसोबत भांडण करू नये. शास्त्रात अशा लोकांशी दोस्ती किंवा शत्रुत्व करू नये, असं सांगितलं आहे. कारण अशा लोकांना चांगलं-वाईट यातला फरक कळत नाही. यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं.
शस्त्र जवळ असलेली व्यक्ती


आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या व्यक्तीच्या हातात शस्त्र असते, अशा व्यक्तींपासून दूर राहिलेलं बरं. या व्यक्तींशी कधीही भांडण करू नये. कारण रागाच्या भरात ती व्यक्ती काहीही करू शकते. तसेच हातातील शस्त्राचा वापर करून जीवघेणा हल्ला करू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -