Friday, November 22, 2024
Homeबिजनेस1 ऑगस्टपासून बदलणार बॅंकेबाबतचा ‘हा’ नियम, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार..?

1 ऑगस्टपासून बदलणार बॅंकेबाबतचा ‘हा’ नियम, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार..?

महिना बदलला, की त्या महिन्याच्या 1 तारखेपासून अर्थविषयक बाबी बदलत असतात. हे बदल तुमच्या-आमच्याशीच संबंधित असतात. त्यामुळे साहजिकच या बदलांचा परिणाम आपल्यावर होत असतो.. त्यामुळे दर महिन्यात काय बदल होतात, याची माहिती असणं गरजेचं आहे..

जुलै महिना संपण्यास आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. पुढील ऑगस्ट महिन्यात बँकिंग क्षेत्राशी निगडीत काही बदल होणार आहे.. या बदलामुळे नागरिकांना काही समस्यांनाही तोंड द्यावे लागू शकते.. त्याचा तुमच्या खिशावरही थेट परिणाम होणार आहे. 1 ऑगस्टपासून कोणते नवे नियम लागू होणार आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

 ऑगस्टमध्ये काय बदलणार.?

चेक पेमेंटमध्ये बदल..

‘बँक ऑफ बडोदा’ने चेक पेमेंट नियमांमध्ये काही बदल केले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, चेक क्लिअरन्सबाबत हे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, 1 ऑगस्टपासून 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकच्या पेमेंटसाठी ‘पॉझिटिव्ह पे सिस्टम’ अनिवार्य करण्यात आले आहे.. त्याशिवाय पेमेंट करता येणार नाही..

बँकिंगमधील फसवणूक टाळण्यासाठी ‘आरबीआय’ने 2020 मध्ये चेकसाठी ‘पॉझिटिव्ह पे सिस्टम’ सुरू केली. चेकद्वारे 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरताना महत्त्वाची माहिती देणं बंधनकारक आहे.. ही माहिती मेसेज, अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएमद्वारे देता येते.. चेकद्वारे पेमेंट करण्यापूर्वी हे तपशील तपासतात. त्यालाच ‘पाॅझिटिव्ह पे सिस्टम’ असे म्हटलं जातं.

गेल्या काही दिवसांत बॅंकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार समोर आले होते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ‘आरबीआय’ने ‘पॉझिटिव्ह पे सिस्टम’ (positive pay system) सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.. बऱ्याच बॅंकांनी हा नियम लागू केला असून, आता ‘बॅंक ऑफ बडोदा’नेही ही सिस्टीम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे..

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -