भारतात PUBG मोबाइलवर बंदी घातल्यानंतर मागील वर्षी Battlegrounds Mobile India (BGMI) हा गेम लॉन्च करण्यात आला होता. आता भारतात Google Play आणि Apple App Store, Krafton वर डाऊनलोडसाठी उपलब्ध असताना येथूनही काढून टाकण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. यामुळे BGMI बॅन झाल्याचं वृत्त पसरत आहे.
प्राप्त माहीतीनुसार, राज्यसभेत बीजीएमआयशी संबंधित नुकताच एक मुद्दा उपस्थित केला. या गेमचा मुलांवर हानिकारक प्रभाव पडत आहे, असं चर्चा झाल्याचं दिसलं. एका मीडिया रिपोर्टनुसार म्हटले म्हटले गेले होते की “गेल्या महिन्यात लखनऊ मध्ये एका मुलाने तो खेळत असलेल्या PUBG च्या आधारावर त्याच्या आईला मारल्याची घटना घडली होती. यामुळे अनेक गेम्सनंतर आता या गेमचं देखील भविष्य
दरम्यान, कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितलं आहे की, “आम्ही Google Play Store आणि App Store वरून BGMI कसे काढले गेले हे आम्ही स्पष्ट करत आहोत आणि आम्हाला विशिष्ट माहिती मिळाल्यावर तुम्हाला कळवू”, असं ते म्हटले आहेत. पण गेमर्स अद्याप थर्ड पार्टी एपीके वेबसाइटवरून हा गेम डाउनलोड करू शकतात.
पण आता अनेक युजर्सना वाटतंय की, पब्जीप्रमाणेच BGMI लाही गुगल प्ले स्टोअरवरून हटवल्यानंतर या गेमवर बंदी घातली जाण्याची तीव्र शक्यता आहे. पब्जी मोबाईल गेमवर बंदी घातल्यानंतर बीजीएमआयला क्राफ्टन इंक कंपनीकडून लॉंच करण्यात आले होते. यामध्ये पब्जी गेमशी मिळतेजुळते काही फीचर्स देखील युजर्सना देण्यात आले होते. त्यामुळे हेच हा गेम हटवण्याचे कारण मानले जाते. मात्र आता गेमर्सना जोरदार मोठा झटका बसला आहे. भारतात नव्हे तर जगातही असे कित्येक नवीन गेम्स येत असतात आणि बंद होत असतात. आता हा मोठा यूजरबेस असणारा गेम बंद होत असल्याची चिन्हे आहे.