Wednesday, July 30, 2025
HomeमनोरंजनDID Super Moms 3 च्या सेटवर भारती सिंगने Vijay Deverakonda ला सर्वांसमोर...

DID Super Moms 3 च्या सेटवर भारती सिंगने Vijay Deverakonda ला सर्वांसमोर केले किस!


दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचा आगामी चित्रपट ‘लायगर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सध्या विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यग्र आहेत. नुकताच त्यांनी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो डीआयडी सुपर मॉम्स 3 च्या सेटवर हजेरी लावली. या शोचा प्रोमो देखील समोर आला आहे. या शोची होस्ट भारती सिंगने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर (Bharati Singh Instagram) या विशेष भागाचा प्रोमो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती अभिनेता विजय देवरकोंडासोबत रोमान्स करताना दिसत आहे.



भारतीने तिच्या पोस्ट केलेल्या या प्रोमोमध्ये विजय आणि अनन्या भारतीच्या लाफ्टर पंचवर हसताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये विजय भारतीला क्यूट म्हणतो आणि यावर भारती म्हणते, ‘मी हॉट पण आहे.’ यानंतर डीआयडी सुपर मॉम्स 3 च्या मंचावर भारती विजयच्या पाठीला किस करते. विजयही भारतीसोबत या कॉमिक केमिस्ट्रीचा आनंद घेताना दिसत आहे. हा प्रोमो व्हिडिओ शेअर करत भारतीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘या वीकेंडला माझी आणि विजय देवरकोंडाची जुगलबंदी देईल मनोरंजनाचा डबल डोस, डीआयडी सुपर मॉम्स पाहत रहा…’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -