Monday, August 4, 2025
Homeमनोरंजनजॅकलिनंतर आणखी एक अभिनेत्री अडचणीत, पोलिसांकडून तब्बल 6 तास चौकशी..

जॅकलिनंतर आणखी एक अभिनेत्री अडचणीत, पोलिसांकडून तब्बल 6 तास चौकशी..

‘मनी लॉन्ड्रींग प्रकरणा’मुळे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चांगलीच अडचणीत आली आहे. सुकेश चंद्रशेखर याच्याकडून महागडे गिफ्ट्स जॅकलिनला देण्यात आले होते. तसेच, या अभिनेत्रीला एका ‘बिग बजेट’ सिनेमात मुख्य भूमिका देण्याची ग्वाहीही सुकेशनं दिली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तिची अनेकदा चौकशी केलीय.

जॅकलिनबरोबरच बाॅलिवूडमधील इतर अभिनेत्रीही सुकेशच्या संपर्कात असल्याचं आढळून आलं होतं. त्यात नोरा फतेहीचाही समावेश असून, मनी लाॅंन्ड्रिंग प्रकरणात आता ही अभिनेत्रीही चांगलीच अडचणीत आली आहे. त्यामुळेच या दोघींची वारंवार पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

नोराची 6 तास चौकशी..

गेल्या आठवड्यातच आर्थिक गुन्हे शाखेने नोराला समन्स बजावले होते. त्यानुसार, नुकतीच ही अभिनेत्री आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीसाठी गेली होती.. पोलिसांनी तब्बल 6 तास तिची चौकशी केली.. या प्रकरणामुळे नोराच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे.

चौकशीदरम्यान तिला 50 प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना नोरा म्हणाली, “मला सुकेशच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल काहीही माहिती नाही. तसेच या प्रकरणातील आरोपी जॅकलिन फर्नांडिससोबत माझा कोणताही संबंध नाही..”

मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरवर तब्बल 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. त्याने ‘फोर्टेस हेल्थ केअर’चे माजी प्रवर्तक शिविंदर सिंह यांच्या पत्नीकडून सुमारे 200 कोटी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आरोपी सुकेशकडून महागडे गिफ्ट्स स्वीकारल्याने बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. जॅकलिन व सुकेशचे काही खासगी फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर बाॅलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती.. त्यानंतर आता नोराही या प्रकरणात सापडली आहे..

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -