एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ महेशकुमार कांबळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात मिरजेचे पोलीस उपधीक्षक अशोक वीरकर यांना पक्षाच्या वतीने कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे,इस्लामपूर शहरात काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे शाकिर तांबोळी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता त्याबरोबरच एमआयएम चे इस्लामपूर शहर अध्यक्ष एजाज मुजावर आणि तालुका अध्यक्ष जाकीर मुजावर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याची पोस्ट फोटो काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पेज वर प्रकाशित केली.
होती यावर एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ महेशकुमार कांबळे यांनी विरोध करत सदरची पक्ष प्रवेश केलेली व्यक्ती एमआयएम पक्षाची नाहीत नाना पटोले यांनी एमआयएम पक्षाचे स्थानिक पदाधिकारी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे सांगत इस्लामपूर सह वाळवा तालुक्यात एमआयएम पक्षात संभ्रमावस्था निर्माण केली असून एमआयएम पक्षाची बदनामी केली असल्याचे सांगितले तर डॉ महेशकुमार कांबळे यांनी असे सांगितले की, एमआयएम चे वाळवा तालुका अध्यक्ष म्हणून बाबू उर्फ इनायतुल्ला मुल्ला तर इस्लामपूर शहर अध्यक्ष पद गेली दोन वर्षे रिक्त आहे असे सांगून व काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे व याबाबत चे निवेदन पोलीस उपधीक्षक अशोक वीरकर आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्याकडे देण्यात आले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात एमआयएम पक्षाचे पोलिस उपधीक्षकाना निवेदन
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -