Monday, August 4, 2025
HomeमनोरंजनRanbir Kapoor Birthday: बालपणी सुपर क्यूट दिसायचा बॉलिवूडचा 'रॉकस्टार'

Ranbir Kapoor Birthday: बालपणी सुपर क्यूट दिसायचा बॉलिवूडचा ‘रॉकस्टार’

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.

40 वर्षांचा झाला रणबीर
रणबीर कपूरचा जन्म 28 सप्टेंबर 1982 रोजी झाला. तो आज वयाची 40 वर्षे पूर्ण करतोय. सध्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटामुळे तो लाइमलाइटमध्ये आहे. यासोबतच तो लवकरच बाबा देखील होणार आहे. पत्नी आलिया भट्ट लवकरच एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे.

सांवरियामधून पदार्पण
रणबीरने सावरिया चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र चाहत्यांच्या मनात त्याने आपले स्थान निर्माण केले.

बॉलिवूडमध्ये निर्माण केली वेगळी ओळख

रणबीर कपूर हा बॉलिवूडमधील कपूर फॅमिलीमधून आला आहे. मात्र त्याने त्याच्या अभिनयाने आपली खास ओळख निर्माण केली आहे.

अभिनायाचे झाले कौतुक

रणबीरने अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात छाप सोडली. त्याचा ‘अजब प्रेम की गजब कहानी’,’रॉकस्टार’ आणि ‘बर्फी’, ‘संजू’ अशा चित्रपटांमधील अभिनयाचे चाहत्यांनी भरभरुन कौतुक केले.

चॉकलेट बॉय आहे रणबीर
रणबीर कपूरला बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हटले जाते. दीपिका पदुकोणपासून कतरिना कैफपर्यंत अनेक अभिनेत्रींना त्याने डेट केले. रणबीर कपूरचे नाव बॉलिवूडमधील अनेक सौंदर्यवतींसोबतही जोडले गेलेय. ज्यामध्ये नाव प्रियांका चोप्रा, नर्गिस फाखरी, सोनम कपूरसह अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे.

आलियासोबत केले लग्न
पाच वर्षांच्या दीर्घ रिलेशनशीपनंतर रणबीर कपूरने आलिया भट्टसोबत लगिनगाठ बांधली. 14 एप्रिल 2022 रोजी हे दोघं विवाहबंधनात अडकले.

लवकरच होणार बाबा
फोटोमध्ये रणबीर आई-बाबा आणि बहिणीसोबत दिसतोय. रणबीर कपूर लवकरच बाबा होणार आहे. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलिया-रणबीरने चाहत्यांना ‘गूड न्यूज’ दिली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -