ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई – शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगल्यानंतर भाजप आणि मनसेकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटावर सातत्याने आरोप आणि टीका केली जाते. मनसचे नेते सोशल मीडियातून शिवसेनेवर बोचरी टीका करत होते. मात्र, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मीडिया किंवा सोशल मीडियावर व्यक्त होऊ नका, असे आदेश दिले आहेत. त्यानंतर, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडि व्यक्त न झालेल्या संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा शिव पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. सहानुभूतीच्या आधारे मत न मागता कामाच्या आधारे मा असे चॅलेंजही त्यांनी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर बोलण्यास देशपांडे यांनी नकार दिला. तसेच, राज ठाकरे मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडतील का, या प्रश्नावरही ते सध्या महापालिका निवडणुका होत आहेत, त्यावर मी बोलेन. विधानसभा आल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर देईन, असे त्यांनी म्हटले.