ताजी बातमी ऑनलाईन टीम
आज सांगली येथील महासभा मिरजेतील ड्रेनेज प्रश्नावरून गाजली , मिरज शहरातील ड्रेनेज टप्पा क्र दोन योजना रखडल्याने आण्णा भाऊ साठे नगर मध्ये संतप्त नागरिकांनी प्रभाग 20 मधील नगर सेवकांच्या डिजिटल पोस्टरला चप्पलचा हार घालून दगड मारले होते.या आंदोलनाने आक्रमक झालेल्या नगर सेवक योगेंद्र थोरात यांनी महासभेतील राजदंड उचलला ,नगर सेवक योगेंद्र थोरात , नगर सेविका स्वाती पारधी यांनी आंदोलनात नागरिकांनी घातलेल्या चप्पलचा हार आणि दगड महासभेत आणून या चप्पल च्या हाराचा खरा मानकरी कोण असा महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील कापडणीस यांना जाब विचारला .
ड्रेनेज टप्पा क्र दोन योजनेचे कामाचा बोर्डावर आराखडा तयार करून दाखवला प्रभाग पाच मधील टप्पा क्र 2 योजनेचे काम बंद असल्याने प्रभाग 20 मधील ड्रेनेज पाणी निचरा होत नसल्याचे कारण सांगितले ,प्रभाग 5 मुळे ड्रेनेज पाण्याचा पूर येत असल्याचा आरोप केल्यानंतर विरोधी पक्षनेते संजय मेंढे आक्रमक झाले यावेळी नगर सेवक योगेंद्र थोरात आणि संजय मेंढे यांच्या जोरदार वादावादी झाली ,महापौर यांच्या फंडातून अण्णा भाऊ साठे नगर ते मिरज ओढा वांडरे ट्रेंड्स मार्गे पाईपलाईन करण्यासाठी 1 कोटी 50 लाख निधी मंजूर केल्यानंतर या वादावर पडदा पडला.