Thursday, August 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : लग्नाचा नवा फंडा; 80 हजार घेऊन मंडपातून तरुणी पसार

कोल्हापूर : लग्नाचा नवा फंडा; 80 हजार घेऊन मंडपातून तरुणी पसार

लग्नासाठी मुलीच्या नातेवाईकांना दीड लाख रुपये देण्याचा व्यवहार ठरला.त्याप्रमाणे मुलगी कोल्हापूरात आल्यावर 60 हजार आणि मंडपात उभारल्यावर 20 हजार रुपये दिले गेले. पैसे मिळाल्यावर मुलीला इशारा झाला आणि ती धावत येऊन कारमध्ये बसली.कार कोल्हापूरच्या दिशेने सुसाट धावली.यानंतर बोंद्रेनगर, जुना वाशीनाका मार्गे गायब झाली.मंगळवारी रात्री ही घटना पन्हाळा तालुक्यातील एका गावात घडली.

पन्हाळा तालुक्यातील एका तरुणाचे लग्न जमत नव्हते.दरम्यान,येथील एका एजंटांने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील स्थळ आणले. त्यासाठी मुलीच्या नातेवाईकांना दीड लाख रुपये देण्याचा व्यवहार ठरला. मुलगी कोल्हापूरात आल्यावर 60 हजार रुपये, ती मंडपात उभारल्यावर 20 हजार रुपये आणि लग्न लागल्यावर उर्वरित 70 हजार रुपये देण्याचे ठरले. रात्री 8.30 वाजताचा मुहुर्त ठरवण्यात आला होता. त्याप्रमाणे सायंकाळी मुलगी, पुण्यातील एक महिला आणि तरुण एका स्विफ्ट कारमधून विवाह दाखल झाले.

ठरल्याप्रमाणे प्रथम 60 हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर ती मंडपात आवरायला गेली. त्यावेळी पुन्हा एजंटांला 20 हजार रुपये दिले. ही रक्कम हातात मिळताच मुलीला इशारा झाला आणि मुलगी धावत येऊन कारमध्ये बसली. त्यावेळी चालकाने विलंब न लावता स्टार्टर मारला आणि कार भुर्रकन कोल्हापूरच्या दिशेने सुसाट धावली. मुलाकडील नातेवाईकांच्या हा प्रकार लक्षात येताच एकच गोंधळ उडाला. यामुळे त्यांनी एका वाहनातून त्यांच्या कारचा पाठलाग केला. पण बौद्रेनगर येथून जुना वाशीनाका मार्गे ती कार प्रचंड वेगाने जावून गायब झाली.

कळे परिसरासह बोंद्रेनगरात या घटनेची चर्चा रंगली होती. मात्र पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली नव्हती.
पुण्याची महिला नातेवाईकांच्या ताब्यातनवरी मुलगीसोबत आलेली पुण्याची महिला घाईगडबडीत तिथेच राहिली. यामुळे ती मुलाच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. तर लग्न ठरवणाऱ्या एजंटांने कमिशन म्हणून घेतलेले 10 हजार रुपये मुलाला परत केले असल्याचे कळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -