ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. भारतीय गोलंदाजांची लाजिरवाणी कामगिरी पहायला मिळाली. भारताला इंग्लंडच्या एकाही खेळाडूला बाद करता आलं नाही. इंग्लंडने सामना 10 विकेटने जिंकला त्यामुळे आता क्रिडाविश्वातून टीम इंडियाला ट्रोल केलं जात आहे. टीम इंडियाच्या पराभवाचं कारण काय? आजचा सामन्यात नेमकं काय चुकलं?, असा सवाल उपस्थित होत असताना आता रोहित शर्माने मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाला रोहित शर्मा ?
आज सामन्यात जे काही झालं त्याने आम्ही खूपच निराश झालो आहोत. चांगली धावसंख्या करण्यासाठी आम्ही बॅकएंडवर चांगली फलंदाजी केली. आम्ही योग्य टप्प्यात गोलंदाजी केली नाही, त्यामुळे आम्ही आज सामन्यात वर तोंड काढू शकलो नाही. वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याच्या भीतीमुळे संघ चांगली कामगिरी करू शकला नाही, असं रोहित शर्मा म्हणाला आहे. आम्हाला सेमीफायनयलचं गांभिर्य निभावता आलं नाही, अशी खंत देखील त्याने व्यक्त केली आहे.
आयपीएल सामन्यात सर्वजण दबावाखाली खेळले आहेत. त्यामुळे त्यांनी आज संयमी खेळ दाखवला.परंतु तुम्हाला त्यांच्या सलामीवीरांना श्रेय द्यायचं आहे, असं म्हणत रोहितने इंग्लंडच्या सलामीवीरांचं कौतूक केलं आहे. मला वाटलं की, पहिल्या षटकात बॉल थोडासा स्विंग झाला. मात्र, तसं काही झालं नाही, असं रोहित म्हणाला.
दरम्यान, या मैदानावर रन चेस करणं सोपं असतं याची आम्हाला जाणीव होती. या मैदानावर आम्ही पहिला सामना जिंकला होता. त्यावेली आम्ही 9 ओव्हरमध्ये 82 धावा केल्या होत्या. तुम्हाला तुमच्या रननितीनुसार खेळू शकला नाही, तर तुम्ही संकटात येऊ शकता, असंही रोहित यावेळी म्हणाला आहे. लाजीरवाण्या पराभवानंतर आता टीम इंडियाला पॅक अप करावं लागतंय.