ताजी बातमी ऑनलाईन टीम
गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ.प्रकाश शहापूरकर यांचा राजकीय वनवास अखेर संपला. तब्बल २३ वर्षांनंतर ते पुन्हा कारखान्याच्या सत्तेत आले आहेत. एव्हाना, त्यांनाच अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी प्रकाश चव्हाण यांना बसविण्याची घोषणा माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी छत्रपती शाहू शेतकरी आघाडीच्या घोषणेवेळीच केल्याने केवळ ‘सोपस्कार’च बाकी आहेत. नोव्हेंबर अखेरीस या निवडी होतील.
१९८०च्या दशकात आप्पासाहेब नलवडे व सहकाऱ्यांनी हरळीच्या फोंड्या माळावर कारखान्याची उभारणी
केली.त्यात डॉ. शहापूरकर यांचे वडील काकासाहेब यांनीही मोलाचे योगदान दिले,पुढे त्यांनीही काही काळ कारखान्याचे संचालक म्हणून काम पाहिले.
दरम्यान,१९८८ मध्ये संस्थापक नलवडे यांच्या विरोधातील शिंदे- कुपेकर- हत्तरकी-कुराडे यांच्या आघाडीने ऐतिहासिक सत्तांतर घडवले.त्यानंतर डॉ.शहापूरकर यांचे जेष्ठ बंधू डॉ. शरदचंद्र यांना अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला होता. १९९५ मध्ये बाबासाहेब कुपेकर व नलवडे यांच्या आघाडीतून शहापूरकर हे पहिल्यांदाच निवडून आले.त्यांनाही कुपेकरांनी अध्यक्षपदाची संधी दिली होती.दरम्यान, कुपेकरांच्या विरोधात त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली.