Sunday, August 3, 2025
Homeक्रीडाIPL 2023 : स्टार खेळाडू बर्थ डे पार्टीत पडला, पाय मोडून घेतला;...

IPL 2023 : स्टार खेळाडू बर्थ डे पार्टीत पडला, पाय मोडून घेतला; RCB ने Get Well Soonचा मॅसेज करून स्वतःला धीर दिला

IPL 2023 Mini Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वाच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. २३ डिसेंबरला आयपीएल २०२३ साठी मिनी ऑक्शन होणार आहे आणि त्यापूर्वी १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व फ्रँचायझींना आपापल्या संघातील रिटेन ( कायम ) केलेल्या खेळाडूंची यादी सादर करायची आहे.

काल मुंबई इंडियन्सने हुकूमी एक्का किरॉन पोलार्डसह पाच खेळाडूंना रिलीज केल्याचे वृत्त येऊन धडकले. त्यांनी जेसन बेहरेनडॉर्फला RCB कडून आपल्या ताफ्यात घेतल्याची अधिकृत घोषणा केली. आज गतविजेत्या गुजरात टायटन्सने ( Gujarat Titans) ल्युकी फर्ग्युसनला कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) सोबत ट्रेड केला. त्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) स्टार खेळाडू बर्थ डे पार्टीत पडला अन् पाय मोडून घेतला. त्यामुळे त्याला बराच काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू फलंदाज ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) याला दुखापत झाली आहे. मेलबर्न येथे शनिवारी मित्राचा पन्नासावा वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना मॅक्सवेलने पायाला दुखापत करून घेतली. त्यामुळे त्याला बराच काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. ऑस्ट्रेलिया घरच्या मैदानावर तीन वन डे सामन्यांची मालिका वर्ल्ड कप स्पर्धेनंतर खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्यात चार कसोटी व ३ वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे.

मॅक्सवेलच्या दुखापतीबाबत अपडेट्स या आठवड्याच्या अखेरीस दिले जातील, असे ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे प्रमुख जॉर्ड बेली यांनी दिले. ग्लेन मॅक्सवेलच्या जागी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सीन अबॉटची निवड केली गेली आहे. दरम्यान, RCB नेही मॅक्सवेलला गेट वेल सून म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -