Sunday, August 3, 2025
Homeतंत्रज्ञानWhatsapp Message Schedule: आता करू शकता व्हाट्सअ‍ॅपवर तुमचे मेसेज शेड्युल

Whatsapp Message Schedule: आता करू शकता व्हाट्सअ‍ॅपवर तुमचे मेसेज शेड्युल

व्हाट्सअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप्सपैकी एक आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच व्हॉट्सअ‍ॅपने वेडं लावलं आहे. व्हाट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी अनुभव अधिक आनंददायक आणि सुलभ बनवण्यासाठी यात असंख्य नवीन गोष्टी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

परंतू, बहुतेक वापरकर्त्यांना एका अपडेटची प्रतीक्षा होती ती आता व्हाट्सअ‍ॅपने पूर्ण केली आहे. वापरकर्त्यांसाठी एक नवीन अपडेट आले आहे ज्यात तुम्ही मेसेज शेड्युल करू शकता. वाढदिवसापासून ते सण उत्सवापर्यंत सर्वांच शुभेच्छा व्हॉट्सअपवर मेसेज करून दिल्या जातात. मात्र अनेकदा महत्वाच्या व्यक्तीला तो मेसेज पाठवायचे राहून जातो अशा वेळेस तुम्हाला हे नवीन अपडेट कामी येणार आहे.

मेसेज शेड्युलिंग हे व्हाट्सअ‍ॅपचे अधिकृत अपडेट नसून, असे एक थर्ड-पार्टी अ‍ॅप आहे जे तुम्हाला उपयोगी येऊ शकते. तसेच शेड्यूल केलेले संदेश तुम्हाला तुमच्या निवडीच्या विशिष्ट वेळी संदेश पाठविण्यास मदत करू शकतात. वाढदिवस आणि वर्धापनदिनासाठीचे मेसेज तुम्ही अगोदर शेड्यूल करू शकता. थर्ड-पार्टी अ‍ॅप वापरून तुम्ही WhatsApp वर पुढीलप्रमाणे मेसेज शेड्यूल करू शकता :

असे करू शकता whatsapp वर मेसेज शेड्यूल

सर्वप्रथम App Store/ Play Store वर जा आणि SKEDit अ‍ॅप शोधा.
त्यानंर Facebook द्वारे साइनइन करा किंवा नवीन अकाउंट तयार करा.
यानंतर तुमचे नाव, ईमेल आणि पासवर्ड टाकून ‘Create Account’ वर क्लिक करा.
वरील स्टेप्स पूर्ण केल्यानंतर तुमच्या ईमेलवर एक कोड येईल तो टाकून तुमचा ईमेल आयडी व्हेरिफाय करा.
व्हेरिफीकेशननंतर तुम्हाला अ‍ॅड सर्व्हिस पेज दिसेल, तेथे व्हॉट्सअ‍ॅपवर क्लिक करा.
SKEDit साठी accessibility permission वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीसाठी मेसेज शेड्यूल करायचा आहे तो WhatsApp संपर्क निवडा. सर्व तपशील, तारखा, वेळ आणि वेळापत्रक टाका. तुम्ही टाकलेला मेसेज शेड्यूल केलेल्या दिवशी तुमच्या प्रिय व्यक्तीपर्यंत सहज पोहोचेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -