Saturday, August 2, 2025
Homeब्रेकिंगVikram Gokhale Health Update: विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा, ४८ तासात व्हेंटिलेटरही...

Vikram Gokhale Health Update: विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा, ४८ तासात व्हेंटिलेटरही काढण्याची शक्यता

ताजी बातमी ऑनलाईन टीम

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले गेल्या ४८ तासांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज सकाळी ११ वाजता आलेल्या मेडिकल बुलेटीननुसार विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे अशी माहिती मिळत आहे.



‘विक्रम गोखले हे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे. ते डोळे उघडत आहेत व हातपाय हलवत आहेत. पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट निघत असून त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर आहे,’ अशी माहिती रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याटगिकर यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -