Wednesday, August 6, 2025
Homeब्रेकिंगमहाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के, 33 मिनिटांत तीन वेळा झटके…!!

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के, 33 मिनिटांत तीन वेळा झटके…!!

महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश व मणिपूरमध्ये शुक्रवारी (ता. 9) रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. अवघ्या 33 मिनिटांत पृथ्वी तीन वेळा हादरली. मात्र, या भूकंपामुळे कुठेही कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

मणिपूरमधील चंदेल इथे रात्री 11.28 वाजता भूकंपाचा पहिला धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.1 होती. भूकंपाचे केंद्र 93 किमी खोल होते. त्यानंतर दोन मिनिटांनी 11.30 वाजता हिमाचल प्रदेशातील चंबा येथे 2.8 रिश्टर स्केलचा धक्का बसला. त्याचा केंद्रबिंदू पाच किलोमीटर खोलीवर होता.

नांदेडमध्ये जाणवले हादरे
महाराष्ट्रातील नांदेडमध्ये रात्री 12.01 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.0 मोजली गेली. त्याचे केंद्र 5 किमी खोल होते.

सुरुवातीला म्यानमारमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल, तर केंद्र 95 किलोमीटर खोल होते. तसेच, दोन दिवसांपूर्वी इंडोनेशियामध्ये 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -