Wednesday, December 25, 2024
Homeमनोरंजनसलमान खान या खास व्यक्तीच्या मुलाला करतोय बाॅलिवूडमध्ये लाॅन्च

सलमान खान या खास व्यक्तीच्या मुलाला करतोय बाॅलिवूडमध्ये लाॅन्च

बाॅलिवूडचा सुपरस्टार सलमान खान हा बिग बाॅस 16 ला सध्या होस्ट करतोय. इतकेच नाहीतर पठाण चित्रपटामध्ये सलमान खानची एक झलक चाहत्यांना बघायला मिळणार आहे. सलमान खान हा अनेक नवीन चेहऱ्यांना बाॅलिवूडमध्ये लाॅन्च करण्यासाठी ओळखला जातो. आतापर्यंत अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना सलमान खान याने लाॅन्च केले आहे. आता लवकरच सलमान खान हा त्याच्या अत्यंत जवळच्या एका व्यक्तीच्या मुलाला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च करणार आहे.

सलमान खान याचा बॉडीगार्ड शेरा खूप जास्त फेमस आहे. आता शेराचाच मुलगा टायगर हा बाॅलिवूडमध्ये पदार्पण करतोय. सलमान खान हा टायगरला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च करणार आहे.टायगरकडे बऱ्याच चित्रपटांच्या स्क्रीप्ट आल्या असल्याची देखील माहिती मिळत आहे. परंतू बाॅलिवूडमध्ये टायगर ज्या चित्रपटामध्ये पदार्पण करत आहे, त्या चित्रपटाची स्क्रीप्ट देखील तयार आहे.

शेराचा मुलगा टायगर हा सतीश कौशिक डायरेक्ट करत असलेल्या चित्रपटामधून पदार्पण करणार आहे. परंतू अजूनही या चित्रपटासाठी अभिनेत्रीला फायनल करायचे राहिले आहे.

साधारण पुढच्या वर्षी या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. टायगरच्या या चित्रपटासाठी अभिनेत्रीचा शोध सुरू आहे. या चित्रपटासाठी स्वत: सलमान खान याने काही अभिनेत्रींसोबत संपर्क साधल्याचे देखील सांगितले जात आहे.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सलमान खान याने शेराच्या मुलाच्या बाॅलिवूडमधील लाॅन्चबद्दल महत्वाची माहिती सांगितली होती. शेराचा मुलगा टायगर याने यापूर्वी असिस्टेंट डायरेक्टर म्हणून देखील काम केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -