Sunday, August 3, 2025
Homeक्रीडाऋषभ पंतबाबत मोठी अपडेट, वाचा पोलिसांनी केलेले महत्वाचे खुलासे..

ऋषभ पंतबाबत मोठी अपडेट, वाचा पोलिसांनी केलेले महत्वाचे खुलासे..

ऋषभ पंतच्या अपघाताला आता दोन दिवस उलटत आले असून त्याला आता डॉक्टरांनी आयसीयूमधून बाहेर काढले आहे. यासोबतच त्याला खासगी वॉर्डमध्ये पुढील उपचारासाठी ठेवले आहे. आता त्याला भेटण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांना, मित्र-मंडळींनादेखील डॉक्टरांनी मनाई केली आहे. कारण ऋषभ पंतला इन्फेक्शन होऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.

पंतचा अपघात झाल्यानंतर 48 तासानंतर त्याला आयसीयूबाहेर काढले आहे. तूम्हाला देखील व्हायरल व्हिडिओमध्ये दिसले असेल की, तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अभिनेते अनिल कपूर, अनुपम खेर आणि काही आमदार ऋषभ पंतला भेटण्यास आले होते. इन्फेक्शन होण्याचा धोका असल्यामुळे पूर्वकाळजी म्हणून व्हीआयपी लोकांनी अशा भेटी टाळाव्यात, असे डॉक्टरांनी आणि दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघाचे (डीडीसीए) संचालक श्याम शर्मा यांनी सांगितले.

हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंग यांनी सांगितले की..

ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला तेव्हा ऋषभ पंत कोणत्याही नशेत नव्हता. समजा तो नशेत असता तर पंत इतक्या दूरपर्यंत येऊ शकला नसता किंवा पेटत्या कारमधून तो इतक्या सहजासहजी बाहेर निघू शकला नसता.

तसेच ते म्हणाले, “आम्ही अपघाताच्या ठिकाणाजवळील 8 ते 10 स्पीड कॅमेरे तपासले आहेत. नॅशनल हायवेवर असलेली वेगमर्यादा पंतने ओलांडलेली नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याच्या कारचा स्पीड अधिक नसल्याचे दिसले. म्हणून वेगमर्यादेचे उल्लंघन देखील त्याने केले नव्हते, असे स्पष्ट होते. आमच्या टेक्निकल टीमने अपघाताचे ठिकाणही तपासले. आम्हाला असा कोणताही पुरावा सापडलेला नाही, ज्यातून पंतने वेगात गाडी चालवल्याचे समजेल’, अशी माहिती त्यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -