नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव पाटील यांचा मुलगा बीएचएमएसचे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्यामुळे त्याची वैद्यकीय शिक्षणाची फी भरण्यासाठी जवळच्या कॅनरा बँकेत संपर्क साधला होता.बँकाकडून तसेच पीक विमा कंपन्यांकडून शेतीच्या कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणे हा प्रकार नवीन नसला, तरी आता कोल्हापूर जिल्ह्यात संतापाचा कडेलोट होईल, असा प्रकार समोर आला आहे. मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी बँकेकडे विनवण्या करुनही कर्ज न दिल्याने शेतकऱ्याने आत्महत्या करुन आयुष्याचा शेवट केल्याची घटना घडली आहे. महादेव पाटील (वय वर्ष 45, रा. पिसात्री ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणात बँकेकडून कोणताही खुलासा आलेला नसला, तरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुबीयांनी मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी कर्ज न दिल्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -