काल सायंकाळी सांगली जिल्ह्यात सर्वत्र कमी अधिक पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काही ठिकाणी द्राक्ष बागा शिल्लक आहेत. तेथे जास्त नुकसान झाले आहे.
नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होताना दिसून येत आहे. नागपुरात काल दुपारपासून सुरू झालेला पाऊस सुरूच असून उन्हाळ्यामध्ये पावसाचा वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळते. आज सकाळपासूनच पावसाळी वातावरण निर्माण झालं असून सगळ्यांची तारांबळ उडाली आहे. हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून तर नुकसानदायक आहेच आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हा नुकसानदायक ठरताना दिसतो. सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने अनेकांनी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. महाराष्ट्रात आज सुध्दा अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसाने पुन्हा झोडपले, पीकांचे नुकसान, राज्यात पावसाची शक्यता
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -