Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरजोतिबा यात्रा ते अंबाबाई रथोत्सवापर्यंत चोरट्यांचा अक्षरश: उच्छाद; अनेकांच्या दागिने, खिशावर डल्ला...

जोतिबा यात्रा ते अंबाबाई रथोत्सवापर्यंत चोरट्यांचा अक्षरश: उच्छाद; अनेकांच्या दागिने, खिशावर डल्ला मारल्याने आनंदावर फेरले पाणी

जोतिबाच्या यात्रेपासून ते अंबाबाई रथोत्सवात चोरीच्या अनेक घटना घडल्या. चैत्र यात्रेत जोतिबाला लाखोंची मांदियाळी असूनही तब्बल 83 चोरट्यांना पकडण्यात आले होते. यानंतर आता अंबाबाई रथोत्सवातही महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार घडला.

दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा, त्यानंतर करवीर निवासिनी अंबाबाई रथोत्सव तसेच सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापूर पर्यटक आणि भाविकांनी फुलून गेले आहे. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी अक्षरश: उच्छाद केला आहे. जोतिबाच्या यात्रेपासून ते अंबाबाई रथोत्सवात चोरीच्या अनेक घटना घडल्या. चैत्र यात्रेत जोतिबा डोंगरावर लाखोंची मांदियाळी असूनही तब्बल 83 चोरट्यांना पकडण्यात यश आले होते. यानंतर कोल्हापुरात दोन दिवस पार पडलेल्या अंबाबाई रथोत्सवातही तीन महिलांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार घडला. त्यामुळे अनेकांच्या आनंदावर पाणी फेरले आहे. पाकिटमारी, सोनसाखळी, मंगळसूत्रांवर चोरट्यांनी डल्ला मारला. यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा तसेच पर्यटकांचा मुखभंग झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -