Monday, July 28, 2025
Homeक्रीडामुंबई आणि हैदराबाद आमने-सामने; प्लेईंग 11 आणि खेळपट्टी कशी आहे?

मुंबई आणि हैदराबाद आमने-सामने; प्लेईंग 11 आणि खेळपट्टी कशी आहे?

आयपीएल 2023 मधील 25 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. हैदराबादमध्ये आज (18 एप्रिल) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना पाहायला मिळणार आहे. हैदराबादच्या घरच्या मैदानावर मुंबई आणि हैदराबाद हे दोन संघ मैदानात आमने-सामने येणार आहेत. आयपीएल 16 व्या हंगामातील ही लढत राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर पार पडणार आहे. या दोन्ही संघांनी त्यांचे शेवटचे दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे या संघांसाठी आजचा सामना जिंकू हॅटट्रिक मिळवण्याची संधी आहे.

मुंबई इंडियन्सने आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांची यंदाच्या आयपीएलची सुरुवात एकसारखीच झाली आहे. दोन्ही संघांनी त्यांचे पहिले दोन सामने गमावले आणि त्यानंतर सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला. मुंबई आणि गुणतालिकेत आठव्या आणि नवव्या स्थानावर असलेले हे दोन्ही संघ दोन गुण मिळवून गुणतालिकेत उडी घेण्याचा प्रयत्न करतील.

हैदराबादला पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून घरच्या मैदानावर आणि नंतर दुसऱ्या सामन्यात लखनौकडून पराभव पत्करावा लागला. पण त्यानंतर, हैदराबादने पंजाबविरुद्धया सामना जिंकला. तसेच कोलकाताचाही पराभव केला

मुंबई (MI) संघाला पहिल्याच सामन्यात बंगळुरुकडून (RCB) कडून आठ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर चेन्नईकडूनही (CSK) पराभव झाला. पण, त्यानंतर हैदराबादने दिल्लीला सहा गडी राखून आणि कोलकाताला पाच गडी राखून पराभूत केलं.

हैदराबाद आणि मुंबई यांच्यातील सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम वर होणार आहे. ही खेळपट्टी पूर्णपणे सपाट असून गोलंदाजांना चांगला बाउंस देते. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंग आणि बाउन्स देते. पहिल्या डावात चांगली फलंदाजी होण्याची शक्यता आहे.

मुंबई इंडियन्स प्लेइंग 11 :
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहाल वढेरा, टीम डेव्हिड, पियुष चावला, हृतिक शोकीन, रिले मेरेडिथ, अर्जुन तेंडुलकर.

हैदराबाद प्लेइंग 11 :
मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम (कर्णधार), अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, मार्को यान्सिन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -