Friday, February 7, 2025
HomeमनोरंजनThe Kerala Story वादावरून सर्वोच्च न्यायालयाचं लक्षवेधी निरीक्षण; सरन्यायाधीश काय म्हणाले एकदा...

The Kerala Story वादावरून सर्वोच्च न्यायालयाचं लक्षवेधी निरीक्षण; सरन्यायाधीश काय म्हणाले एकदा पाहाच…

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गेल्या काही दिवसांपासून वादात असणारा चित्रपट ‘द केरला स्टोरी’ अखेर प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून या चित्रपटाभोवती वादंग निर्माण झाला आहे. या चित्रपटाविषयी सर्वाच्च न्यायालयानं महत्त्वाची टिप्पणी दिली आहे. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कशाप्रकारे धर्मांतर करण्यात आले यावर हा चित्रपट बेतलेला आहे. या चित्रपटावरून बराच वादंग निर्माण झाला असून चित्रपटाला विरोध करण्याऱ्यांनी न्यायलयाची पयारी चढली आहे. त्यामुळे या चित्रपटाविरोधात जमियत उलेमा-ए-हिंदच्या वकिलांनी परत एकदा सर्वाच्च न्यायलयाची पायरी चढली आहे. त्यावर आता सुप्रिम कोर्टानं महत्त्वाची टिप्पणी केली आहे.

यावेळी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की, ”तुम्ही वारंवार चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करता आहात. परंतु निर्मात्यांसह चित्रपटाशी संबंधित अनेक लोकांनी या चित्रपटासाठी मेहनत घेतली आहे. त्यांच्या कष्टाकडे दुर्लेक्ष करून चालणार नाही. लोकांना ठरवू द्या की हा चित्रपट चांगला आहे की वाईट.” त्यामुळे सीबीएफसीनं या चित्रपटाला प्रदर्शित करण्याचे प्रमाणपत्र दिल्यानं सीबीएफसीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी सर्वाच्च न्यायलयानं नकार दिला असून कोर्टात मांडलेली ही याचिका काल फेटाळून लावण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -