Saturday, August 2, 2025
HomeसांगलीSagli : कारची डंपरला धडक, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू!

Sagli : कारची डंपरला धडक, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू!

जत विजापूर-गुहागर राज्य मार्गावर जत पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अमृतवाडी फाट्याजवळ स्वीप्ट कारने समोरून येणाऱ्या ट्रकला चुकविण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील पाच जण मयत झाले. गाणगापूरला दत्त देवाचे दर्शन घेऊन विजयपुर मार्गे जतकडे येत असताना हा अपघात रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला.

या अपघातात चालक दत्ता हरीबा चव्हाण (वय 40रा जत), नामदेव पुनाप्पा सावंत 65, पदमिनी नामदेव सावंत 60, श्लोक आकाशदिप सावंत वय 8 मयुरी आकाशदिप सावंत वय 38 सर्व रा. मुळ राहणार शेंगाव तर सध्या रा. जत) मध्ये राहण्यास आहेत. हे चौघे जण एकाच कुटुंबातील असुन आजी, आजोबा सून व नातू याचे मयत झाले आहेत. या अपघातात वरद सावंत हा वय दहा वर्ष हा गंभीर जखमी झाला आहे.

मूळ गाव शेगाव (ता. जत) येथील चारजण रहिवाशी आहेत. मात्र सध्या जत येथील एम आय डी सी जवळ रहात आहेत. अपघात घडताच प्रथम दर्शनी दोघेजण जखमी अवस्थेत असलेल्या आई मयुरी सावंत व मुलगा वरद सावंत यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. वरद यास तातडीने पुढील उपचारासाठी सांगलीला नेण्यात आले. भाडोत्री कार घेऊन ते देवदर्शनासाठी गेले होते. चालक म्हणुन दत्ता चव्हाण एकाच कुटुंबातील चारजण रहिवाशी आहेत. तर यात एक चालक ही मयत झाला आहे. असे मिळुन पाच जण मयत झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -