Monday, July 28, 2025
Homeअध्यात्मसोमवारी किंवा एकादशीला नारळ फोडले तर काय होते?

सोमवारी किंवा एकादशीला नारळ फोडले तर काय होते?

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक रूढी, परंपरा या पूर्वीपासून चालत आलेले आहेत. म्हणजेच बरेच जण हे या परंपरा आजही काटेकोरपणे पाळतात. परंतु आपल्यापैकी बरेच जण याच्याकडे अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष करीत राहतात. तर मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये सोमवारी तसेच एकादशीला नारळ फोडणे हे अशुभ मानले गेलेले आहे. त्यामुळे बरेच जण हे सोमवारी आणि एकादशीला नारळ फोडत नाहीत.

परंतु सोमवारी आणि एकादशीला नारळ न फोडण्यामागे नेमके कारण काय आहे म्हणजेच नारळ जर सोमवारी, एकादशीला फोडला तर नेमके काय होते? याविषयीची  माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो आपण जर सोमवारी किंवा एकादशीला जर नारळ फोडला तर ही एक ब्रह्महत्या म्हणजेच देवहत्या मानली गेलेली आहे. त्यामुळे सोमवारी आणि एकादशीला नारळ फोडणे अशुभ मानले गेलेले आहे.

एकादशी हा विष्णूंचा वार मानला जातो. या दिवशी सर्व  देव हे विष्णूंचा उपवास करतात आणि या दिवशी जर आपण नारळ फोडला तर विष्णूंना मारहाण केल्यासारखे समजले जाते. तसेच सोमवार हा महादेवांचा वार असतो. बरेच लोक सोमवारी देखील महादेवांचे उपवास करीत असतात. नारळामधील जे पाणी आहे हे गंगा मानले जाते.

मग सोमवारच्या दिवशी जर आपण नारळ फोडला तर त्या गंगेचा अपमान केल्यासारखे होते. त्यामुळे सोमवारी आणि एकादशीला जर नारळ आपण फोडले तर एक प्रकारची ब्रह्म हत्या मानली गेलेली आहे. देवांचा अपमान केल्यासारखे आहे. नारळ हे ब्रम्हांडाचे प्रतीक मानले गेलेले आहे. त्यामुळे नारळाची पूजा केली जाते. अनेक सण समारंभामध्ये पूजा विधीमध्ये नारळाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे.

विधीवत त्याची पूजा देखील केली जाते आणि देवाचे तत्व असणारे हे नारळ सोमवारी आणि एकादशीच्या दिवशी नारळ फोडले जात नाही. कारण जर आपण या दोन दिवशी जर नारळ फोडले तर हे ब्रह्महत्या मानली जाते आणि यामुळे मग आपणाला अनेक प्रकारची संकटे, अडचणी येण्यास सुरुवात होते आणि आपण पापाचे भागीदार देखील होतो. तर त्यामुळे तुम्ही देखील मित्रांनो इतर कोणत्याही दिवशी तुम्ही नारळ फोडू शकता. परंतु सोमवार आणि एकादशीच्या दिवशी अजिबात नारळ फोडू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -