कर्नाटकात काँग्रेसचा विजय झाला आहे. काँग्रेसने 136 जागा जिंकत विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे. तर भाजपला केवळ 65 जागा जिंकला आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आलेत. याचा काँग्रेस आनंद साजरा करताना दिसत आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी काँग्रेस विजयी उत्सव साजरा करताना दिसत आहे.
मुंबईमध्ये फटाके फोडले
कर्नाटकात काँग्रेसचा विजय झाल्यानंतर मुंबईतील प्रभादेवीमधल्या टिळक भवन या काँग्रेसच्या प्रदेश कार्यलयात जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीकडून या ठिकाणी विजय जल्लोष साजरा करण्यात आला. टिळक भवन कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. काँग्रेस कार्यालयाबाहेर फटाके फोडून घोषणाबाजी करत पेढे वाटत जल्लोष साजरा करण्यात आला.
पुरोगामी आणि सेक्युलर विचाराचं सरकार आता संपूर्ण देशामध्ये येणार असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसला हनुमान पावला. तिथली लोक पावली. भाजपला कुणी पावलं नाही, अशी टीका यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली.पुण्यातही आनंद साजरा
पुण्यातील काँग्रेसच्या कार्यलयात आनंद साजरा करण्यात आला. पुण्यातील कार्यलयात नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मईची प्रतिकात्मक प्रेतयात्रा जाळत काँग्रेसकडून भाजपचा निषेध करण्यात आला. काँग्रेस कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील विजयाचा जल्लोष साजरा केला.
इचलकरंजीत जल्लोष
कोल्हापूरमधील इचलकरंजी शहरातही काँग्रेसने विजयोत्सव साजरा केला. काँग्रेसने बाईक रॅली काढत साखर वाटप करून फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आल्यामुळे महाराष्ट्रात मोठा जल्लोष पाहायला मिळतोय. महाराष्ट्रात जागोजागी काँग्रेसने आनंद उत्सव साजरा केलाय. 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसला मोठा विजय होण्याचा आत्मविश्वास यावेळी नेते आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येतोय.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यानंतर सोलापुरात कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला.ठाण्यातही काँग्रेसने जल्लोष केला. सर्व सामन्य ठाणेकरांना रिक्षा चालकांना लाडू वाटतं आनंद साजरा करण्यात आला.
दरम्यान दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयातही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राहुल गांधीही यावेळी उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी आनंद व्यक्त केला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानलेत. कर्नाटक निवडणुकीत एका बाजूला गरीब जनता होती आणि एका बाजूला ताकतवर नेते होते. आम्ही गरिबांच्या मुद्द्यांवर लढलो. आम्ही द्वेषाने राजकारण करत लढाई लढलो नाही. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झाला आहे प्रेमाची दुकान खोलली आहेत. आम्ही कर्नाटकच्या जनतेला जी आश्वासनं दिली होती. ती आम्ही पूर्ण करणार आहोत, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यावेळी दिली.
कर्नाटकमध्ये निवडणूक जिंकली अन् काँग्रेसचा महाराष्ट्रभर जल्लोष
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -




