Monday, July 7, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत बकरी ईद उत्साहात!

इचलकरंजीत बकरी ईद उत्साहात!

इचलकरंजी, शहर परिसरात मुस्लिम बांधवांच्यावतीने बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. येथील स्टेशन रोडवरील ईदगाह मैदानावर झालेल्या सामुहिक प्रार्थनेवेळी विश्वशांतीसह सामाजिक सलोखा, चांगले पाऊसमान यासाठी साकडे घालण्यात आले.

येथील हजरत सय्यद मख्तुमवली दर्गा आणि इदगाह ट्रस्ट यांच्यावतीने स्टेशन रोडवरील इदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रुहानी मस्जिदचे मुफ्ती फिरोज चाँदकोटी यांनी बयान तर कबनूर मदरसा येथील कारी मुज्जमील यांनी नमाज, दुआ पठण केले. यावेळी देशभरात पाऊसमान चांगले व्हावे आणि महापुरासह सर्व संकटापासुन सर्वांचे रक्षण करण्याची सामुहिक प्रार्थना करण्यात आली.

नमाज पठणामुळे इदगाह मैदान परिसरात गर्दी झाली होती. नमाज पठणानंतर उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. नमाज पठणानंतर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे – पाटील, उपअधिक्षक समिरसिंह साळवे, प्रांताधिकारी मौसमी बर्डे- चौगुले, हजरत सय्यद मख्तुमवली दर्गा आणि इदगाह ट्रस्टचे बादशाह बागवान, अहमद मुजावर यांनी मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या. दरम्यान शहरात अन्य ठिकाणी शांततेत नमाज पठण झाले. दिवसभर मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी भेटीगाठी घेताना दिसत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -