गेल्या काही दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाच्या निष्काजीपणामुळे शहरात पाच ते सहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा आहे. याप्रकारामुळे शहरवासियांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शहराला दोन पाणी योजना असून ही नियोजन अभावी पाण्याविना शहवासीयांना राहावे लागत आहे. याबाबत आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पाण्यासारखा जिव्हाळ्याचा विषय कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.
चार लाख लोकसंख्येच्या गावाला पुरेसे आणि शुद्ध पाणी दररोज देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे.
मात्र महानगरपालिका प्रशासन आपल्या जबाबदारीपासून पळ काढताना दिसत आहे. सध्या शहराला
तीन उपसा केंद्राचा फायदा काय मजरेवाडी येथून कृष्णा नदीतून पाणी उपसा करून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जलवाहिनीस गळती लागल्यास अथवा कृष्णा नदीची पाणी पातळी कमी असल्यास पंचगंगा नदीतून पाणी उपसा करता यावा यासाठी मागील वर्षे नव्याने कट्टीमळा डोह येथे पाण्याची नियोजन करण्यात आले आहे.
मात्र तेथून किती पाणी उपसा होतो हे पाणीपुरवठा विभागालाच माहिती नसेल तसेच मुख्य जलवाहिन्या चांगल्या नसतील तर उपसा केंद्र उभारून प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी काय साधले असा प्रश्न आता नागरिकातून उपस्थित होत आहे. स्वतःच्या फायद्यासाठी कट्टी मळा उभारला का ? अशीही विचारणा होऊ लागले आहे
मजरेवाडी, पंचगंगा नदी आणि कट्टी मळा येथून पाणी पुरवठा केला जातो. इतके ठिकाणी असूनही शहराच्या पाणी पुरवठ्याला नेहमीच गळतीने ग्रासले आहे. त्यामुळे शहराला चार ते पाच दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे.
महानगरपालिका गळती काढण्यासाठी वर्षाला कोट्यावधी रुपये खर्च करत असते मात्र अद्यापही त्यांना या मुख्य जलवाहिनीवरील गळती काढण्यात यश मिळालेले नाही. कधी पंपिंग मशीन बदलण्याचा विषय पुढे येतो तर कधी पाण्याला गळती लागते हे दुष्टचक्र सुरूच आहे.
महानगरपालिका पाणीपट्टीच्या रूपाने नागरिकांच्याकडून कर गोळा करते त्याअर्थी त्यांना शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी आहे. पाणीपट्टी भरली नाही तर नळ तोडणी सारखे कारवाई केली जाते.
गळतीच्या नावाखाली शहर वेठीस इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीस गळती आहे, असे सांगत शहरवासियांना पाण्याविना ठेवण्याचे काम पाणीपुरवठा प्रशासनाकडून केले जात आहे. गळती काढण्यास एक दिवस लागेल असे सांगून प्रसिद्धी पत्रक काढून आपली बाजू काढून घेण्याचा प्रकार पाणीपुरवठा विभाग करत असतो. याबाबत पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना आयुक्तांनी जाब विचारून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत केला पाहिजे, अशी माफक अपेक्षा शहरवासियांतून व्यक्त होत आहे.
मात्र पाणीपुरवठा खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून पाणी पुरवठामध्ये चुकारपणा होत असताना आयुक्त श्री. ” दिवटे त्यांच्याकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. शहराला जर तीन ठिकाणातून पाणी येत असेल तर त्या पाण्याचे योग्य नियोजन होणे “आवश्यक आहे जर नियोजन योग्य झाले तर पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही.
नेमके पाणीपुरवठा विभागात पाणी कुठे मुरते याची चाचपणी करण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर आली आहे. तत्कालीन आयुक्त देशमुख असताना त्यांनी पाण्याचे चांगले नियोजन केले होते किमान दिवसाआड शहराला पाणीपुरवठा होत होता. मात्र देशमुख यांच्या बदलीनंतर पाणीपुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे. जर आयुक्तांना या विभागाची माहिती नसेल तर शहरांमध्ये यापूर्वी पाणीपुरवठा विभागात काम केलेल्या तज्ञ यांच यांच्याकडून माहिती घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.