Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगआधी भुजबळ, नंतर फडणवीस…आता थेट राज्य सरकारलाच इशारा; मनोज जरांगे पाटील काय...

आधी भुजबळ, नंतर फडणवीस…आता थेट राज्य सरकारलाच इशारा; मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात सभांचा धडाका लावला आहे. या सभांमधून ते जोरदार हल्ला चढवत आहेत. आधी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या जरांगे यांनी अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. फडणवीस यांनी काड्या करू नये. मराठा आंदोलनाच्या आड येऊ नये, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आता तर त्यांनी थेट सरकारलाच इशारा दिला आहे. 24 तारखेच्या आत आरक्षण द्या.

नाही तर आम्हाला काय करायचं हे आम्हाला माहीत आहे, असा सूचक इशारा देतानाच मी मॅनेज होण्यासाठी हे आंदोलन सुरू केले नाही आणि सरकरमध्येही मला मॅनेज करायचा दम नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आरक्षणचाी ही लढाई इतक्या टोकावर जाईल असं सरकारलाही वाटलं नसेल. आपला लढा गोरगरीब लोकांनाच लढावा लागणार आहे. 24 डिसेंबरला मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार आहे. राजकीय नेत्यांना महत्त्व देऊ नका.

आरक्षण मिळाले की काहीही करा, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ज्या समाजाला मायबाप मानलंय ते माझ्यावर कौतुकाची थाप नाही तर कुणावर टाकणार? आरक्षणासाठी माणूस गमवायचा नाही. एकेक जोडायचा आहे. मला मराठा समाजाचा स्वाभिमान आहे. ही जात कोट्यवधीच्या संख्येने एकत्र आली, असंही ते म्हणाले. आता आमच्या आड येऊ नका मराठा पेटत नाही आणि पेटला तर विझत नाही. मराठे पुन्हा मागे हटत नाही. अख्खा देश मराठ्यांचं आंदोलन बघतोय. काही जण घरात बसून मराठ्यांची एकी बघतात. आपलं बघून बऱ्याचशा जातींचे लोक एकत्र येत आहेत.

तुम्हाला आरक्षण मिळालं. आम्ही विरोध केला नाही. आता आम्हाला विरोध करू नका. काय करायचं हे तुम्हीच ठरवा, असं आवाहन त्यांनी केलं. मराठ्यांकडे होतं त्यावेळी मराठ्यांनी सगळ्यांना दिलं. स्वतःच्या मुलांना दिलं नाही ते इतरांना दिलं, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -