ताजी बातमी /ऑनलाईन टीम
नुकताच होळी व धुळवड शहरात मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने पार पडली. यामध्ये अनेकांनी रंगांची उधळण केली तर काही जणांची अजून रंगपंचमी बाकी आहे. अशा अमाप उत्साहात होळी व धूळवड वस्त्र नगरीत साजरी करण्यात आली.
याचाच एक भाग म्हणून येथील आसरा नगर परिसरात बालचमुनी अनोख्या पद्धतीने धुळवड साजरी केली. यामध्ये काही मुलांनी विविध रूपातील वेशभूषा परिधान केली. याबरोबरच उखाणे घेणे, गाणी म्हणणे, तसेच आपल्या जवळ जवळील कला गुण सादर करणे असे छोटे छोटे कार्यक्रम या बालचमुनी सादर केले.
साहजिकच या मुलांचे ही वेशभूषा आणि कार्यक्रम पाहून अनेकांनी वाहवा करत दाद दिली. दरम्यान या मुला- मुलींचे सादर केलेल्या कलेबद्दल आता सर्वत्र कौतुक होत आहे.