Friday, February 7, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत निवडणुकीनंतर पैजांवर पैजा : कोणी पैसे लावते तर कोणी वाहनांची पैज

इचलकरंजीत निवडणुकीनंतर पैजांवर पैजा : कोणी पैसे लावते तर कोणी वाहनांची पैज

ताजी बातमी/ ऑनलाइन टीम

नुकताच लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. मतदानानंतर ठिकठिकाणची मतदानाची टक्केवारी समजल्यानंतर आता कार्यकर्ते तसेच पारावर बसणारी मंडळी अमुक उमेदवार इतक्या मताने येणार तर तमुक उमेदवार हा घासाघासिने का होईना इतका मताने निवडून येऊ शकतो. अशा अनेक चर्चांना उत आले आहे.

तर काही मंडळी हातात विविध दैनिके घेऊन झालेली टक्केवारी सांगत कोण उमेदवार कुठल्या भागातून किती वाढू शकतो आणि कुठला उमेदवार कुठल्या भागात कमी मतदान झाल्याने मागे पडू शकतो हे अगदी पटवून सांगत आहेत.

दुसऱ्या बाजूला आधुनिक चर्चा करणारी मंडळी वेगवेगळे पोल दाखवून त्या पोल बद्दलची विश्वासार्हता तसेच तो पोल चुकीचाही कसा असू शकतो याबद्दल आपापले मोबाईल उघडुन दाखवत आहेत.

इतकेच नाही तर काही उमेदवारांबद्दल निवडून येण्याची खात्री वाटणारी मंडळी विविध प्रकारच्या पैज लावत आहेत. यामध्ये पाचशे रुपयांपासून लाखातील पैजा लावल्या जात आहेत. तर काही मंडळी हा उमेदवार हरला किंवा हा उमेदवार निवडून आला तर मी ही गाडी देतो. अशा प्रकारच्या पैजा लावल्या जात आहेत.

तर काही मंडळी अगदी सखोल आकडेवारी सांगत निवडणुकीच्या मोठ्या अभ्यासात बोलण्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -