Saturday, August 2, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : चेक बोंस प्रकरणी  एकास दंडासह शिक्षा

इचलकरंजी : चेक बोंस प्रकरणी  एकास दंडासह शिक्षा

धनादेश न वटताच परत आलेप्रकरणी सुरेश दादु कुंभार (रा. कबनूर) यास दोषी ठरवून इचलकरंजी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीसो यांनी सहा महिने साधी कैद आणि १० लाख ११ हजार ६० रूपये इतकी नुकसान भरपाई व नुकसान भरपाई न दिलेस एक महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

सुरेश दादु कुंभार यांनी श्री. बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेकडून ५ लाख रूपये इतक्या कर्ज रकमेची उचल केली होती. या कर्ज रक्कमेच्या परतफेडीपोटी रकम रुपये ५ लाख ५ हजार ५३० रूपये इतक्या रकमेचा धनादेश दिला होता. मात्र सदरचा धनादेश न बटताच परत आल्याने सुरेश दादु कुंभार यांचेविरुद्ध न्यायालयात केस दाखल करण्यात आली होती.

याप्रकरणी सुनावणी होऊन व फिर्यादीच्या वतीने अॅड. राहुल मानसिंग महाजन यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. अॅड. महाजन यांना अॅड. सपना होगाडे व शिल्पा अंबीलडोके यांनी सहाय्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -