Monday, December 23, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीच्या बीएमडब्ल्यू ग्रुपची सामाजिक बांधिलकी : गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य 

इचलकरंजीच्या बीएमडब्ल्यू ग्रुपची सामाजिक बांधिलकी : गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य 

 

इचलकरंजी –

लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत बीएमडब्ल्यू ग्रुपच्या वतीने शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील होतकरु व गरजू विद्यार्थी, खेळाडू यांना आवश्यक साहित्याचे वाटप केले जाते. यंदाही राधानगरी तालुक्यातील मानबेट या अतिदुर्गम भागातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे.

मागील तीन वर्षांपासून बीएमडब्ल्यू ग्रुपच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत दुर्गम भागातील विद्यार्थी-विद्यार्थीनी व खेळाडूंसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून मदतीचा हात दिला जात आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत मानबेट आणि चौके या गावात जावून साहित्याचे वाटप केले जाते. तीन वर्षात ग्रुपच्या माध्यमातून सायकल, शैक्षणिक साहित्य, खेळाडूंना आवश्यक ते साहित्य पुरविण्यात आले आहे.

राधानगरी तालुक्यातील मानबेट व चौके ही गावे अत्यंत दुर्गम भागात असून दळणवळणाची सोयच नसल्याने येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज पाच ते दहा किलोमीटर पायपीट करावी लागते. तेथील विद्यार्थ्यांची गरज ओळखून त्यांना हवी ती मदत करण्यासाठी बीएमडब्ल्यू ग्रुपने पुढाकार घेतला आहे. या ग्रुपचे अध्यक्ष सर्जेराव घोरपडे, अ‍ॅड. अशोक तांबे, अ‍ॅड. विश्‍वास चुडमुंगे, उद्योगपती शैलेश सातपुते, मराठा समाजाचे नेते सुरेशदादा पाटील, डॉ. प्रदीप पाटील, उद्योगपती विनय मगदूम, सुनील पाटील, गणेश कवडे, दीपक पोटे, ज्योतीराम जाधव, डॉ. सिमोन आवळे, ओमजी छापरवाल, विजय बनसोडे, विलास पाडळे, कुमार अकिवाटे, डॉ. आशिष दरुरे, अतुल गांधी, राजू शिंत्रे, डॉ. रमेश जठार, डॉ. बाळकृष्ण पाटील, विनायक विभुते, सुनील रेवणकर, अनिल रेवणकर, डॉ. दीपक काडगे, प्रदीप लडगे, रमेश जगवानी, जयंत पानगावकर आदी विविध क्षेत्रातील व्यक्तींनी या ग्रुपची स्थापना केली आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांचे आचार व विचार रुजवावेत या उद्देशाने गरजू मुला-मुलींसाठी दरवर्षी एक स्तुत्य असा उपक्रम राबवला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -