Friday, February 7, 2025
Homeइचलकरंजीमहाविद्यालयात प्रवेशासाठी अडचणी असल्यास माणुसकी फौंडेशनशी संपर्क साधा : रवींद्र जावळे

महाविद्यालयात प्रवेशासाठी अडचणी असल्यास माणुसकी फौंडेशनशी संपर्क साधा : रवींद्र जावळे

इचलकरंजी

शिक्षणाची इच्छा असूनही केवळ परिस्थितीमुळे वंचित राहणार्‍या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी माणुसकी फौंडेशनने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार तुकडी वाढवून अशा विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, अशी मागणी व्यंकटेश महाविद्यालय आणि गोविंदराव हायस्कूल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेज येथे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोणालाही प्रवेशाबद्दल अडचण असल्यास त्यांनी माणुसकी फौंडेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन फौंडेशनचे अध्यक्ष रवींद्र जावळे यांनी केले आहे.

इचलकरंजी शहर तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील दहावी, बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा असूनदेखील केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागते. सध्या सगळीकडे अ‍ॅकॅडमीचे पेव फुटले असल्याने त्याचा शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशावरही परिणाम होऊ लागल्याचे चित्र आहे. परंतु अ‍ॅकॅडमीची भरमसाठ फी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न परवडणारी असल्याने इच्छा असूनही पुढील शिक्षणासाठी आर्थिक अडचण निर्माण होते. त्यामुळे अशा सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी माणुसकी फौंडेशन प्रयत्नशील असते.

त्याच अनुषंगाने फौंडेशनचे अध्यक्ष रवींद्र जावळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य विजय माने यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी गरज पडल्यास एखादी तुकडी वाढवून कोणीही गरजू विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार याची दक्षता घ्यावी अशी मागणी केली. तसेच कोणाची अडवणूक करण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही जावळे यांनी दिला आहे. त्याचबरोबर कोणाही विद्यार्थ्यास प्रवेशाची अडचण आल्यास त्यांनी माणुसकी फौंडेशनशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

यावेळी मनोज चौगुले, रंकीत रॉय, चेतन चव्हाण, प्रथमेश इंदुलकर, मधुर पाटील, ओंकार सुतार, सौरभ चव्हाण, प्रवीण मंगलेकर, कृष्णा इंगळे, सुमित पाटील, अभी शेटके, ऋषिकेश सातपुते, सागर भोसले, प्रतीक पाटील, नितीन चौगुले व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -