Friday, February 7, 2025
Homeराशी-भविष्यदिवाळीनंतर शनिदेव बदलणार चाल! नोव्हेंबरपर्यंत हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ ५ राशींचे नशीब?...

दिवाळीनंतर शनिदेव बदलणार चाल! नोव्हेंबरपर्यंत हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ ५ राशींचे नशीब? मिळू शकतो अपार पैसा

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनुसार त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला स्थिती उलट गतीशी संबंधित असते, तर थेट गतीला ग्रहाची मार्गी गती म्हणतात. यावेळी २०२४ मध्ये अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचालीत बदल होणार आहेत. शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीमध्ये उपस्थित आहेत. २९ जून २०२४ रोजी शनिदेव वक्री झाले आहेत. आता शनिदेव या राशीत १३९ दिवस उलटी चाल चालेल. शनीची ही स्थिती १५ नोव्हेंबरपर्यंत राहील. शनीची ही स्थिती ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाची मानली जाते. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये दिवाळीनंतर शनिदेव आपली चाल बदलणार आहेत. शनिदेवाची चाल बदलल्याने काही राशींवर शनिदेवाची विशेष कृपा राहण्याची शक्यता आहे. त्यांना आयुष्यात अपार यश, पैसा लाभण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

 

‘या’ राशींवर शनिदेवाची कृपा?

मेष राशी

शनिच्या वक्री स्थितीमुळे मेष राशीच्या लोकांना भरपूर फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला कौटुंबिक जीवनाचा आनंद अनुभवता येऊ शकतो. या काळात तुम्ही वाहन किंवा घर खरेदी करू शकता. तसंच या काळात तुमच्याकडे भरपूर पैसा येऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती यावेळी मजबूत होऊ शकते. यासोबत रखडलेली कामही यावेळी पूर्ण होऊ शकतात.

 

वृषभ राशी

वृषभ राशीवर शनिदेवाची विशेष कृपा असू शकते. या काळात तुम्ही केलेल्या प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तसंच तुम्ही तुमच्या कुटुंबियासोबत चांगला वेळ घालवू शकाल. याकाळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळू शकते. त्यासोबत तुम्ही यावेळी नवीन काम सुरू करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला शनिदेवाची साथ मिळू शकते. या काळात तुम्ही परदेशी प्रवास देखील करू शकता.

 

कन्या राशी

शनिदेवाच्या कृपेने या राशीच्या लोकांना नशिबाची मजबूत साथ मिळू शकते. यासोबत जे लोक शिक्षण क्षेत्राशी निगडित आहेत त्यांना याकाळात शनिदेव यश मिळवून देऊ शकतात. तसंच या काळात तुमच्यावर लक्ष्मी देवी प्रसन्न असू शकते. त्यामुळे या काळात पैशांची कमतरता दूर होऊ शकते. अचानक तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळू शकतात. तुम्ही नवीन गाडी खरेदी करू शकता.

 

वृश्चिक राशी

शनिदेवाच्या वक्री स्थितीमुळे वृश्चिक राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांना या काळात नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. व्यवसायात चांगले यश मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चांगली होण्याची शक्यता आहे.

 

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांना देखील शनिच्या वक्री स्थितीचा विशेष फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला कोणत्याही जुन्या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -