Thursday, September 19, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : 'काळ' थांबला, सरवडेतील अपघाताची 'वेळ' येण्यासाठी

कोल्हापूर : ‘काळ’ थांबला, सरवडेतील अपघाताची ‘वेळ’ येण्यासाठी

काळ आणि वेळ आल्याच्या घटना आपण कित्येक वेळा ऐकतो; परंतु सरवडे येथे झालेल्या अपघातात सोळांकूर येथील तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात हसतखेळत गप्पा मारणार्‍या शुभम धावरेसह आकाश आनंदा परीट, रोहन संभाजी लोहार, सौरभ सुरेश तेली, भरत धनाजी पाटील या तरुणांना गारगोटी येथील मंडळाचे गणेशोत्सव देखावे बघण्याची इच्छा झाली.

 

ही मंडळी जात असलेली पाहून ऋत्विक राजेंद्र पाटील या कॉलेज युवकालाही गणेशोत्सव पाहण्याचा मोह आवरता आला नाही. सारं काही व्यवस्थित पार पडले होते; पण रोहनचे वडील भजन आटोपून येतो, असे बोलल्यामुळे हे सहा जण तब्बल सुमारे 45 मिनिटे मुदाळ तिट्टा येथे थांबले आणि हिच 45 मिनिटे तीन मित्रांच्या आयुष्याचा काळ ठरली.

 

सरवडे – मांगेवाडीदरम्यान काल झालेल्या भीषण अपघातात गावातील तीन उमद्या तरुणांचा मृत्यू झाला. चार जण जखमी झाल्याने गावावर ऐन गणेश उत्सवात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात शुकशुकाट पसरला आहे. केवळ तरुणांच्या घरातील नातलगांच्या हृदय पिळवटून टाकणार्‍या आक्रोशाचा आवाज येत आहे. मंडळातील एका मित्राची गाडी घेऊन हे सहा जण दुपारी तीन वाजता गणेशोत्सव बघण्यासाठी गारगोटी येथे गेले. येथेच त्यांनी रात्री साडेनऊच्या दरम्यान जेवण केले व मार्गस्थ झाले.

 

परंतु, रोहन लोहार याचे वडील संभाजी हणमंत लोहार यांनी वाघापूर येथील भजन संपवून आपणही गावाकडे येणार असून मुदाळ तिट्टा येथे थांबण्यास सांगितले. जवळपास तब्बल 45 मिनिटे हे सहाजण त्यांची वाट बघत थांबले. रात्री बाराच्या दरम्यान ते तिथे येताच ते सात जण सोळांकूरकडे निघाले; परंतु सरवडे – मांगेवाडीदरम्यानच्या एका वळणावर तळकोकणातून चिरा घेऊन येणार्‍या कर्नाटकातील ट्रकचालकाचा सुसाट ट्रकवरील ताबा सुटला आणि थेट बोलेरोला धडक दिल्याने बोलेरो चक्काचूर झाली.

 

अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांच्या घरी सकाळी पहाटे सहा वाजता कल्पना दिल्यानंतर घरातील व भाऊबंदकीतील तसेच मंडळाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -