शिक्षण क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली हाती आलेल्या माहितीनुसार आता उत्तर प्रदेश मधील जवळपास 27 हजार प्राथमिक शाळा बंद होऊ शकतात. शिक्षण विभागाने देखील या शाळा बंद करण्याची तयारी पूर्ण केलेली आहे. ज्या शाळांमध्ये 50 पेक्षा कमी पटसंख्या आहे. त्या शाळा बंद करण्यात येणार आहेत. आणि त्या मुलांना जवळपासच्या शाळांमध्ये पाठवले जाणार आहे.
नुकतीच एक बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीत या संदर्भात निर्देश देण्यात आलेले आहे. 13 किंवा 14 नोव्हेंबर रोजी या मुद्द्यांवर सर्व बीएसए सोबत बैठक आयोजित करण्यात येईल असे देखील सांगण्यात आलेले आहेत. यावर आम आदमी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाने युपी सरकारवर निशाणा धरला आहे. त्यांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केलेला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, महासंचालकांनी 23 ऑक्टोबर रोजी शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, भारत सरकार शाळांना पूर्णपणे व्यावहारिक बनवण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळा जवळच्या शाळांमध्ये विलीन केल्या जातील. 50 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या प्राथमिक शाळांच्या संदर्भात आकडेवारी आणि प्राधान्याच्या आधारे तयारी पूर्ण करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या. कोणत्या शाळेचे जवळपासच्या कोणत्या शाळेत विलीनीकरण करता येईल हे ध्यानात ठेवण्यास अधिकाऱ्यांना सांगितले.
वाहतूक, मुलांची उपलब्धता, कालवा, नाला, महामार्ग आदींचा विचार करून आराखडा तयार करताना प्रत्येक शाळेसाठी एक पानाची नोंद ठेवावी, असेही सांगण्यात आले. अशा सर्व शाळांबाबत जिल्ह्याची एक पुस्तिकाही तयार करावी. या संदर्भात 14 नोव्हेंबर रोजी सर्व BSA सह बैठक होणार आहे. आणि फायनल निर्णय त्यातच घेतला जाणार आहे.