मनुष्य जातीवर व पक्षांवर होणारा प्रतिकूल परिणाम टाळण्याच्या दृष्टीने अशा प्लॅस्टिकच्या किंवा (सिंथेटिक) कृत्रिम धाग्याचा वापर करण्यावर इचलकरंजी शहरात प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याने याबाबत अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांचे दालनामध्ये बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये शहरात नायलॉन, चिनी घातक मांजा वापरावर प्रतिबंधक करणे, उपाययोजना याबाबत निर्णय घेण्यात आले.
नायलॉन, चिनी घातक मांजा वापर, साठवण यावर दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करण्यात येणार असून दंडात्मक कारवाई पाच हजार रुपये पर्यंत करण्यात येणार आहे. तसेच यात सुधारणा न झाल्यास पुन्हा वापर व विक्री साठवण आढळल्यास रक्कम पाच हजार रूपये दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
तेव्हा कोणीही नागरिक, विक्रेते यांनी नायलॉन, चायनीज व घातक मांजा विक्रीस ठेवू नये व वापरू नये असे सर्व दुकानदार व नागरिकांना आवाहन करण्यात करण्यात आले.
या बैठकीस एस.के.वायदंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, व्ही . एस. घुगे, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, डॉ. सुनीलदत्त संगेवार , आरोग्य अधिकारी, इचलकरंजी महानगरपलिका, सुभाष आवळे, प्रभाग अधिकारी इ. उपस्थित होते.