Saturday, February 22, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : आजपासून पहाटे ६, रात्री १० वाजता भोंगा वाजणार

इचलकरंजी : आजपासून पहाटे ६, रात्री १० वाजता भोंगा वाजणार

नागरिकांच्या सोईस्तव व सार्वजनिक सुरक्षिततेकरिता महानगरपालिके मार्फत जलशुद्धीकरण केंद्र येथे नव्याने बसविणेत आलेल्या आवाजी यंत्रणा (भोंगा) उद्या बुधवार, ता. १९ फेब्रुवारी पासून सकाळी ६ व रात्री १० वाजता वाजविणेत येणार आहे. इचलकरंजी शहर हे उद्योगनगरी म्हणून परिचित आहे. शहरातील उद्योजक व नागरिकांना वेळेचे जाणीव व्हावी यासाठी तत्कालीन

 

नगरपालिकेच्यावतीने राणीबाग जवळील जलकुंभावरून पहाटे ६ वाजता व रात्री १० वाजता भोंगा वाजविण्यात येत

होता, त्यामुळे या शहरातील नागरिकांना या भोंग्याची सवय

झाली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून सदरचा भोंगा बंद

जलशुध्दी केंद्रावर नव्याने लावण्यात आलेला भोंगा.

अवस्थेत होता. शहरातील विविध संघटना नागरिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी आर्दिच्या मागणीवरून महानगरपालिकेच्यावतीने नव्याने जलशुध्दीकरण केंद्र येथे नव्याने भोंगा लावण्यात आला होता.

 

गेल्या आठवड्यामध्ये त्याची चाचणीही घेण्यात आली होती. सदर मोग्याबाबत नागरिकांकडून सुचना व हरकती ही मागविण्यात आल्या होत्या. अखेर उद्या बुधवार, ता. १९ पासून पहाटे ६ वाजता व १० वाजता भोंगा वाजविण्याचा निर्णय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -