Sunday, July 27, 2025
Homeइचलकरंजीघरफोडी कबनूरमध्ये लाखांचा ऐवज लंपास

घरफोडी कबनूरमध्ये लाखांचा ऐवज लंपास

कबनूर येथील दत्तनगरमध्ये एका घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून एक लाखाचा ऐवज लंपास केला. याबाबतची फिर्याद आसीफ राजु खानापुरे (वय २५, रा. दत्तनगर गल्ली क्र. ८) यांनी दिली आहे. ही घटना २१ एप्रिलच्या रात्री ११.३० ते २२ एप्रिलच्या पहाटे ४.१५ वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी खानापुरे हे घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना चोरट्यांनी संधी साधली. अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचा कोयंडा तोडून प्रवेश केला व आतील लाकडी कपाट उघडून सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज चोरून मेला. चोरट्यांनी ३.५ ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स, ०.४ ग्रॅमचे बेल, २ ग्रॅमचा मणी चांदीचा कमरेचा नेकलेस, मुद्या, सोन्याचे पान, मुलांच्या हातातील चांदीच्या बिंदळ्या व ७ हजाराची रोख रकम असा माल लंपास केला. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -