गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात एकामागून एक खून, लुटमार, चोऱ्या अशा घटनांचे प्रमाण वाढतच आहे.अशातच आता जालना जिल्ह्यात मित्रांनेच मित्राची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.दारू पिण्याच्या वादावरून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील जामवाडी शिवारात ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. बंटी रंजवे असे हत्या करण्यात आलेल्या 30 वर्षीय तरुणाचे नाव असून संदीप राऊत असे हत्या करणाऱ्याचे नाव आहे. बंटी रंजवें आणि संदीप राऊत हे दोघे तसे मित्र होते. परंतु, एक छोट्याशा कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला पोहचला कि यातून एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केली. याचं कारण म्हणजे, दारू पाजली नाही म्हणून एका मित्राने दुसऱ्याला आईवरून शिवीगाळ केली. मित्राला शिवीगाळ करणं या तरुणाला चांगलंच महागात पडलं. ज्याला आईवरून शिवीगाळ केली त्यांने शिवीगाळ करणाऱ्या मित्राच्या गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्याची हत्या केली.मयत आणि आरोपी हे दोघंही जालन्यातील कन्हैयानगर भागातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
दरम्यान पोलिसांनी आरोपी संदीप राऊतवर तालुका जालना पोलिसांत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.