Monday, July 7, 2025
Homeइचलकरंजीगावभागात घरफोडी ४४ हजाराचा ऐवज लंपास

गावभागात घरफोडी ४४ हजाराचा ऐवज लंपास

गावभाग विठ्ठल मंदिर नजीक चौगुले चाळ येथील बंद घराचा कडीकोयंडा उचकटून सुमारे ४४ हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. ही चोरीची घटना २७ जून ते चार जुलै २०२५ या दरम्यान च्या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी किरण राधाकिशन तिवारी (वय ५२) यांनी गावभाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी किरण तिवारी हे १९ मार्च २०२५ रोजी हैदराबाद येथे आपल्या बहिणीकडे गेले होते. तेव्हा घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी २७ जून ते ४ जुलै या कालावधीत कडीकोयंडा उचकटून चोरी केली. यामध्ये | चोरट्यांनी पाच चांदीच्या मूर्ती, एक ताट, एक वाटी, पितळेची आणि जर्मनची भांडी, इन्वर्टर बॅटरी आणि दोन हँड मिक्सर तसेच रोख तीस हजार रुपये रक्कम असा सुमारे ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक फौजदार नन्नवरे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -