Tuesday, July 22, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी, कोल्हापूर मनपा सह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये निवडणूक...

इचलकरंजी, कोल्हापूर मनपा सह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये निवडणूक रणधुमाळी

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर गती मिळाली असून, ऑक्टोबर-नोव्हेंबर राज्यभरात २०रात असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकांपासून जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि नगरपंचायतीं पर्यंत लोकशाहीचा हा उत्सव रंगणार असून, प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे.

१४ जुलै २०२५ रोजी राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघांचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला. त्यानुसार प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील गट आणि गण रचना निश्चित झाली आहे.

 

२०११ च्या जनगणनेच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या आराखड्यावर २८जुलैपर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. ११ ऑगस्ट रोजी सुनावणी होईल आणि १८ ऑगस्ट रोजी अंतिम आराखडा

प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतर आरक्षण सोडत जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी उडण्याची शक्यता आहे.

 

जिल्हा परिषद निवडणुकांनंतर दुसऱ्या टप्प्यात राज्यातील विविध नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबर २०२५ मध्ये घेण्यात येणार आहेत. कोल्हापूर कागल, आजरा, चंदगड, मलकापूर यांसारख्या ठिकाणच्या नगरपालिकांमध्ये नव्या प्रतिनिधींची निवड होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रशासकांमार्फ त चालणाऱ्या या नगरपरिषदांमध्ये पुन्हा लोकप्रतिनिधींना संधी मिळणार आहे. (पान २ वर)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -