आयफोन बनविणारी कंपनी एप्पल आपला नवा iPhone 17 ची सिरीज लवकरच लाँच करणार आहे. या iPhone 17 आणि 17 Pro मध्ये नेमका काय बदल असणार कोणते नवे फिचर आहे याची माहीती उघड झाली आहे. नवा आयफोन येत्या सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लाँच होऊ शकतो. या नव्या सिरीजमध्ये फिचर्स,कॅमरा आणि अन्य डिटेल्स संदर्भात नवनवे दावे केले जात आहेत. चला तर पाहूयात काय असणार फिचर्स..
एप्पलच्या दरवर्षाच्या ट्रेंड पाहिला तर कंपनी नेहमी दुसऱ्या आठवड्याच्या मंगळवार किंवा बुधवारी आपली लाँचिंग करत असते. परंतू गेल्या वर्षी सोमवारी लाँचिंग होत पायंडा मोडला गेला होता. या वर्षी कंपनी ९ वा १० सप्टेंबरला iPhone 17 सिरीजला लाँच करु शकते.
Dynamic Island होणार अपग्रेड
Tomsguide च्या रिपोर्ट्सनुसार, यंदा कंपनी iPhone 17 साठी Dynamic Island ला रिडिझाईन करु शकते. ही आधीच्या तुलनेत छोटा असू शकतो. तसेच याच फंक्शन आणि कंट्रोल्सना सामील केले जाऊ शकते. iPhone 18 संदर्भातही लीक्स समोर आले आहेत. ज्यात असा दावा केला जात आहे की कंपनी FaceID सेंसर आदींना हाईड करु शकते.
Apple यावर्षी लाँच करणार iPhone 17 Air
Apple या वर्षी iPhone 17 सिरीजमध्ये एक नवा डिव्हाईस iPhone 17 Air ला लाँच करु शकते. या हँडसेट संदर्भात आता पर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत. ज्यात दावा केला आहे की हा आतापर्यंतचा सर्वात स्लीम आयफोन असू शकतो. असे असले तरी या फोनच्या जाडीसंदर्भात अजूनपर्यंत कंपनीने अधिकृत काही घोषणा केलेली नाही.
सिंगल रियर कॅमरा
iPhone 17 Air च्या आत स्लीम बॉडी सह रिअर पॅनलवर सिंगल कॅमेरा सेंसर मिळणार आहे. यात सिंगल फ्रंट कॅमेरा देखील मिळणार आहे. बातम्यांनुसार असे वारंवार म्हटले जात आहे की हा हँडसेट iPhone 17 Plus ची जागा घेऊ शकतो.
iPhone 17 Pro सीरीजचे कथित कव्हर देखील जारी करण्यात आले आहेत. त्यातून असे कळते की यंदा कंपनी कॅमेऱ्याची प्लेसिंगमध्ये थोडा बदल करण्याची शक्तता आहे.