शहापूरमध्ये असणाऱ्या गट नंबर ४६८ या गटातील जागेवर शहापूरकरांचा आठवडी बाजार आणि म्हसोबा यात्रा कायमस्वरूपी भरत आली आहे. सदरच्या म्हसोबा देवाच्या यात्रेकरिता आणि आठवडी बाजाराकरिता आहे. ही जागा कमी पडत असताना यामधील निम्म्यापेक्षा जास्त जागेवर आरटीओ कार्यालय बांधण्याचा घाट घातला जात आहे.
उर्वरित जागेमध्ये मेघराजा मंदिर, विनायक हायस्कूल, कुस्ती मैदान आणि चाळीस फूट रस्ता यांचे क्षेत्र
खास. धैर्यशिल माने यांना निवेदन देताना उदयसिंग पाटील, रतन वाझे, प्रधान माळी व इतर.
वगळता जे क्षेत्र शिल्लक राहणार आहे. त्या क्षेत्राचा विचार केल्यास सद्यस्थितीमध्ये आणि भविष्यातील
वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता आता असणारी संपूर्ण जागा या आठवडी बाजारासाठी आणि
यात्रेकरिता कमी पडत आहे. या जागेवर आरटीओ कार्यालय झाल्यास निम्म्यापेक्षा जास्त जागा कमी होईल आणि यामुळे भविष्यात काय परिस्थिती उद्भवू शकते याचा संपूर्ण सारांश खासदार धैर्यशील माने बांच्यासमोर मांडला.
यावेळी ग्रामस्थांच्या भावना ऐकून घेऊन खास. धैर्यशील माने यांनी या निर्माण झालेल्या पेचातून सुवर्णमध्य काढून ग्रामस्थांच्या लक्ष्धाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. हे निवेदन देताना आठवडी बाजार बचाव कृती समितीचे उदयसिंग पाटील, रतन वाझे, प्रधान माळी, दिलीप पाटील, सचिन राणे, संतोष काळगे उपस्थित होते.