Tuesday, September 16, 2025
Homeमहाराष्ट्रपूर्ववैमनस्यातून घरात घुसून तोडफोड; 12 जणांवर गुन्हा दाखल

पूर्ववैमनस्यातून घरात घुसून तोडफोड; 12 जणांवर गुन्हा दाखल

भोसरीत जुन्या भांडणातून 12 जणांनी एका तरुणाच्या घरात घुसून तोडफोड केली. ही घटना बुधवारी (दि. 3) खंडेवस्ती, भोसरी येथे घडली.या प्रकरणात सूरज जयसिंग जाधव (18, रा. खंडेवस्ती, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

 

त्यानुसार, प्रतीक प्रशांत जावळे, ऋषिकेश विकास लष्करे, प्रीतम सुधीर जावळे, देवांश ऊर्फ ईल्या, साहिल तुपसौंदर, शुभम शिंदे, अनुज कुमार, निखिल कांबळे, अनुज जाधव, प्रेम शर्मा, प्रेम शिंदे आणि भुर्‍या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी आरोपी ऋषिकेश लष्करे, साहिल तुपसौंदर, निखिल कांबळे आणि प्रेम शर्मा यांना अटक करण्यात आली आहे.

 

फिर्यादी घराबाहेर थांबले असताना जुन्या भांडणातून काही आरोपी रॉड आणि काठ्या घेऊन आले. त्यांनी हदहशत निर्माण केली आणि भांडण सोडवण्यासाठी जमलेल्या लोकांना धमकावले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या घरात घुसून सामान अस्ताव्यस्त केले. घराबाहेर पडल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या आई-वडिलांना धमकी दिली. काही आरोपींनी फिर्यादीची दुचाकी आणि दोन रिक्षांची तोडफोड करून नुकसान केले. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -