Saturday, September 20, 2025
Homeमहाराष्ट्रग्राहकांना अजून एक गुडन्यूज; LPG सिलेंडर स्वस्त होणार? GST कपातीचा मिळणार दिलासा?

ग्राहकांना अजून एक गुडन्यूज; LPG सिलेंडर स्वस्त होणार? GST कपातीचा मिळणार दिलासा?

22 सप्टेंबरनंतर GST Reforms अंतर्गत अनेक बदल होतील. नवीन जीएसटी दर लागू होतील. त्याचा अनेक वस्तूंच्या किंमतींवर थेट परिणाम होईल. देशातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल. खाद्यपदार्थांसह अनेक दैनंदिन वस्तू स्वस्त होतील. जीएसटी कपातीमुळे आता एलपीजी गॅस सिलेंडर सुद्धा स्वस्त होतील का? अशी चर्चा रंगली आहे. 22 सप्टेंबरनंतर एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव (LPG Cylinder Price) खरंच कमी होतील का?

 

एलपीजी सिलेंडर भारतीय घरांमध्ये, रेस्टॉरंट, हॉटेल आणि अन्न उद्योगात उपयोगी ठरतो. इंधन म्हणून गॅसचा वापर होतो. पण घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरवर वेगवेगळा जीएसटी लागू आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरातील स्वयंपाक घरात जेवण तयार करत असाल अथवा हॉटेलमध्ये जेवण तयार होत असेल तर त्यावर किती जीएसटी आकारल्या जातो, त्यावरुन ग्राहकांना किती अधिकची रक्कम मोजावे लागते हे गणित स्पष्ट होते.

 

घरगुती गॅसवर किती जीएसटी?

 

घरगुती गॅससाठी किती जीएसटी लागू होतो? हे अनेकांना माहिती नाही. 3 सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेच्या बैठकीत घरगुती एलपीजी सिलेंडवरील जीएसटी दरात कोणताही बदल झालेला नाही. 22 सप्टेंबर रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरवर 5 टक्क्यांचा जीएसटी लागेल. त्यामुळे ग्राहकांना कोणताही दिलासा मिळणार नसल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षात एलपीजी गॅसच्या किंमती दुप्पट झाल्याने ग्राहक नाराज आहेत.

 

नवीन जीएसटी दर आता किती

 

घरगुती गॅस (सबसिडी) 5 टक्के

घरगुती गॅस (विना सबसिडी) 5 टक्के

व्यावसायिक गॅस सिलेंडवर किती जीएसटी?

 

3 सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेच्या बैठकीत घरगुती एलपीजी सिलेंडवरील जीएसटी दरात कोणताही बदल झालेला नाही. 22 सप्टेंबर रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरवर व्यावसायिक ग्राहकांना 18 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना सुद्धा जीएसटी परिषदेच्या जीएसटी कपातीचा कोणताही दिलासा मिळाला नसल्याचे दिसून येते. म्हणजे 22 सप्टेंबरनंतर घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल दिसणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -