Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रआणखी एक अट! लाडक्या बहिणींना आता 'या' बाबतही द्यावी लागणार माहिती; अन्यथा...

आणखी एक अट! लाडक्या बहिणींना आता ‘या’ बाबतही द्यावी लागणार माहिती; अन्यथा लाभ थांबणार, नवीन नियम कोणता? वाचा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. या योजनाचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांनी नोंदणी केली. या योजनाच्या माध्यमातून लाखो पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत.

 

पण या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भारही आला आहे. आता हा भार सोसवेनासा झाल्याने तसेच खोटी माहिती देऊन लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांमुळे या योजनेत अनेक बदल करण्यात आले.

 

नुकताच या योजनेसाठी लाभार्थ्यांची ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली असतानाच आता आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील लाभार्थांच्या संख्या घटणार आहे. या योजनेतील लाभार्थ्यांच्या सोबतच आता पती किंवा वडिलांची ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्न किती आहे, याचीही आता राज्य सरकारकडून पडताळणी केली जाणार आहे.

 

राज्य सरकारने ईकेवायसी बंधनकारक केली याचं कारण म्हणजे बहुतांशी महिलांचे उत्पन्न हे अडीच लाखांच्या वर नसल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे आता राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न शोधण्यासाठी पती किंवा वडिलांची ई केवायसी बंधनकारक केली आहे.

 

नवे बदल

 

लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असल्यास लाभार्थी महिलेला अपात्र ठरवण्यात येईल.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अशी मुख्य अट आहे.

लाभार्थींचे लग्न झालं असेल तर पतीचं आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचं उत्पन्न याची चौकशी केली जाणार आहे.

ई-केवायसी प्रक्रिया कशी करायची?

 

१ लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करायची आहे.

 

२. या प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल.

 

यात तुमचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल.

 

४. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पेजवर लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड नोंदवा, तो नोंदवताना चूक होणार नाही याची दक्षता घ्या. कॅप्चा कोड नोंदवल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या.

 

५. आधार प्रमाणीकरण संमती मधील मजकूर वाचून मी सहमत आहे, या पर्यायावर क्लिक करा. यानंतर ओटीपी पाठवा हा पर्याय निवडा, यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -