सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. तुमचे नुकतेच शिक्षण पूर्ण झालंय आणि तुम्ही नोकरी शोधताय तर ही उत्तम संधी आहे. भारत सरकारच्या सेंट्र कोलफील्ड्स लिमिटेड कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.
सीसीएलमध्ये ११८० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.तुम्हाला जर सरकारी कंपनीत काम करायचे असेल तर ही उत्तम संधी आहे. या अप्रेंटिसशिपमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहे. यामुळे तुम्हाला इतर कुठेही नोकरीची संधी मिळू शकते. तुमचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट दिले जाणार आहे.
सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेडमधील कंपनीतील या नोकरीसाठी तुम्ही www.centralcoalfields.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२५ आहे. यामध्ये ट्रेड अप्रेंटिस, फ्रेशर अप्रेंटिस, टेक्नीशियन अप्रेंटिस आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदांसाठी भरती केली जाणार आहे.
पात्रता
सीसीएलमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ३ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये एनटीसी सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. १२वी पास/ डिप्लोमा/ एलएलबी /बीबीए /बीसीए/ ग्रॅज्युएट असलेले उमेदवार अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठी १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी कमाल वयोमर्यादा २७ वर्षे आहे. फ्रेशर अप्रेंटिसशिप पदासाठी २२ वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शक्षणिक पात्रतेनुसार होणार आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही.
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करताना सुर्वाता आधी तुम्हाला www.apprenticeshipindia.gov.in/ रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर https://nats.education.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. यामध्ये अप्रेंटिसवर जाऊन क्लिक करा आणि तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यावर क्लिक करा आणि माहिती भरा. यानंतर फॉर्म सबमिट करा.