महाराष्ट्र एसटी महामंडळात आतापर्यंतची सर्वात मोठी भरती निघाली आहे. तब्बल १७ हजार ४५० जागा भरल्या जाणार आहे. त्यांचा पगार किमान ३० हजार रुपयांच्या पुढे असेल. दिवाळीआधी त्यासाठी निविदा काढली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची आज माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून एसटीमध्ये मोठ्या प्रमाणात चालक-वाहकांची कमतरता आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी एसटी महामंडळात भरती काढण्यात आल्याचे समजतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळात कंत्राटी पद्धतीने ही पदभरती होणार आहे.चालक, सहाय्यक या पदे भरली जाणार आहेत. कंत्राटी भरती झालेल्यांना ३० हजार रूपये इतके किमान वेतन असेल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. त्यासाठी दोन ऑक्टोबर रोजी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. तीन वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने १७ हजार ४५० जागा भरल्या जाणार आहेत. यामुळे राज्यातील हजारो तरूण, तरूणींसाठी रोजगार उपलब्ध होणार आहे.
एसटी महामंडळात कंत्राटी पद्धतीवर चालक आणि साहाय्यक पदे भरली जाणार आहे. कंत्राटी भरती झालेल्यांना महामंडळाकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या ३०० व्या संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी २ ऑक्टोबर रोजी निविदा निघणार आहे. ई निविदा ६ प्रादेशिक विभागानुसार ऑनलाईन राबवण्यात येणार आहे. या कंत्राटी भरतीमुळे मोठ्या प्रमाणात तरूण-तरूणींना नोकरीची संधी मिळणार आहे. ३ वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. ३ वर्षांनंतर यामध्ये मुदतवाढ मिळण्याचीही शक्यता आहे. एसटी महामंडळात दरवर्षी नव्या बस येत आहेत, इलेक्टॉनिक बसची संख्या वाढवण्यात येत आहे. त्यामुळे पुरेशे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती काढण्यात आल्याचे समोर आलेय.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ३०० व्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर (कंत्राटी पद्धतीने) ३ वर्ष कालावधीसाठी घेण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे. अर्थात, ही ई-निविदा प्रक्रिया ६ प्रादेशिक विभाग निहाय राबविण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल. कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवाराला सुमारे ३०,०००/- वेतन देण्यात येणार आहे. याबरोबरच उमेदवारांना एसटी कडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. बसेस ची वाढती संख्या त्यासाठी लागणारे हे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.